
R Ashwin Viral Video: भारताचा फिरकीपटू आर अश्विनने काही दिवसांपूर्वीच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने अचानक निवृत्तीची घोषणा करत तो लगेचच मायदेशातही पोहचला होता. त्याच्या या निर्णयाने सर्वांना चकीत केले होते.
दरम्यान निवृत्तिनंतरही तो नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय दिसला असून क्रिकेटबाबत विविध प्रतिक्रिया देतानाही दिसला आहे. मात्र, त्याने नुकतेच हिंदी भाषेबाबत केलेल्या एका विधानाने वादाला तोंड फुटले आहे.