

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये सक्रिय आहेत. तो आगामी आयपीएल २०२५ हंगामातही चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे खेळून ५ वर्षे पूर्ण केली असल्याने चेन्नईने त्याला ४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. आयपीएल २०२५ हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने तयारीला सुरुवात केली असून खेळाडूंचे शिबिर सुरू केले आहे.