

भारताचे माजी कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यात मैदानाबाहेरही चांगली मैत्री आहे. बऱ्याचदा त्यांच्यातील बाँडिंग मैदानातही दिसून आले आहे. तसेच आयपीएलमध्येही जेव्हा ते आमने-सामने असतात, तेव्हाही दोघांमधील बाँडिंग दिसते. त्यांच्यात किती चांगले नाते आहे, हे काही वर्षांपूर्वी विराटने दिलेल्या एका विधानातून दिसून आले होते.
त्यावरच आता धोनीनेही भाष्य केले आहे. दरम्यान, धोनीने हे देखील मान्य केले आहे की तो लोकांशी संपर्क ठेवण्यात इतका चांगला नाही. काही दिवसांपूर्वीच हरभजन सिंगने म्हटले होते की त्याचं धोनीशी बोलणं होत नाही.