CSK: १४.२ कोटी खर्चूनही CSK देणार खेळाडूला निरोप? स्टार ऑलराऊंडरसह विकेटकिपरवरही टांगती तलवार; कोण आहेत हे खेळाडू?

CSK Retention and Release IPL 2027: चेन्नई सुपर किंग्स प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोघांना रिलीज करण्याची शक्यता आहे. दोन्ही खेळाडूंवर CSK ने प्रत्येकी १४.२ कोटी रुपये खर्च केले होते. लिलावासाठी पर्स वाढवण्याच्या दृष्टीने संघ मोठा निर्णय घेऊ शकतो.
CSK Retention and Release IPL 2027

CSK Retention and Release IPL 2027

esakal

Updated on: 

CSK Retention and Release IPL 2027: आयपीएल २०२७ साठी आता सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. अशातच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

आगामी हंगामाच्या लिलावासाठी जास्तीत जास्त पैसे शिल्लक राहावेत, यासाठी चेन्नई काही खेळाडूंना रिलीज करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...