
भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यापूर्वी माजी कर्णधार एमएस धोनीशी बोलत नसल्याचे सांगितल्याने बराच चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा त्याने धोनीबाबत मोठे भाष्य केले आहे. पण यावेळी त्याने धोनीच्या नेतृत्व क्षमतेचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्याने धोनीला कोणत्याही डेटाची गरज नसल्याचे म्हटले आहे.