Sanju Samson celebrates his century as CSK secure their first win of IPL 2026 at Chepauk.
esakal
IPL 2026 points table CSK moves to ninth position Marathi Updates : चेन्नई सुपर किंग्सने, सर्वच आघाड्यांवर उत्कृष्ट खेळ केल्याचे शनिवारी पाहायला मिळाले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात CSK चा संघ दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये तीन पराभवानंतर CSK ने चेपॉकवर पहिल्या विजयाची चव चाखली. संजू सॅमसन ( Sanju Samson) या पर्वातील पहिला शतकवीर ठरला. त्याला आयुष म्हात्रेची दमदार साथ मिळाली आणि त्यानंतर सर्फराज खान व अकिल होसेन यांच्या अविश्वसनीय झेलने मॅच ला कलाटणी दिली. जेमी ओव्हरटनच्या तीन विकेट्सने DC कडून मॅच खेचून आणली. CSK ने या विजयासह IPL 2026 Point Table मध्ये नवव्या स्थानावर कूच केली.