IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

IPL 2026 CSK vs KKR Marathi Cricket News : चेन्नई सुपर किंग्सने काही मोठ्या चुका करूनही कोलकाता नाइट रायडर्सवर मात करत इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. मैदानावर तीन सोपे झेल टाकल्यानंतरही CSK ने सामन्यावर पकड राखली. त्यामागे प्रमुख कारण ठरला नूर अहमद.
CSK Win Despite Fielding Errors, KKR Still Searching for First Victory

CSK Win Despite Fielding Errors, KKR Still Searching for First Victory

esakal

Updated on

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Marathi Update: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. कोलकाता नाइट रायडर्सची पाचव्या सामन्यात विजयाची पाटी कोरीच राहिल्याने त्यांचा IPL 2026 मधील प्रवास खडतर झाला आहे. CSK घरच्या मैदानावरील सामन्यात तीन सोपे झेल टाकले, परंतु नूर अहमदने ( Noor Ahmad ) ४-०-२१-३ अशी अप्रतिम स्पेल टाकून KKR ला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. १३ षटकांच्या आत सहा फलंदाज गमावल्यानंतर KKR ला पुनरागमन करणे अवघडच झाले होते. CSK ने विजय मिळवून IPL 2026 POINT TABLE मध्ये मुंबई इंडियन्सला मागे ढकलले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com