CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

IPL 2026 CSK vs PBKS Marathi Cricket News : चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानावरही पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्सने चेपॉकवर २१० धावांचे आव्हान सहज पार करत दमदार विजय नोंदवला. या विजयासह पंजाबने सलग दुसरा सामना जिंकत आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.
CSK Suffer Home Defeat as PBKS Chase 210 with Ease, Go Top of IPL 2026 Table

CSK Suffer Home Defeat as PBKS Chase 210 with Ease, Go Top of IPL 2026 Table

esakal

Updated on

IPL 2026 Chennai Super Kings vs Punjab Kings Marathi Update: चेन्नई सुपर किंग्सच्या नशिबी घरच्या मैदानावरही पराभवच लिहिला गेला...CSKला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सकडून पराभव पत्करावा लागला. PBKS सलग दोन विजयांसह गुणतालिकेत ( IPL 2026 Point Table) अव्वल स्थानी पोहोचले आहेत. आयुष म्हात्रेने मैदान दणाणून सोडले, परंतु पंजाबकडून सलामीवीर प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंग यांनी सडेतोड उत्तर दिले. पंजाबने २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले. चेन्नईचे सर्व गोलंदाज निष्प्रभ ठरले आणि ही गोष्ट त्यांना पुढील प्रवासातही डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे. चेन्नईचा हा घरच्या मैदानावरील सलग सहावा पराभव ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com