

CSK Coaching Staff Changes | Hardik Pandya Trade Updates
Sakal
CSK Batting Coach Updates : इंडियन प्रीमियर लीग २०२७ साठी डिसेंबरमध्ये लिलाव होणार आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्सने संघाबाबत मोठे फेरबदल केले आहेत. चेन्नईने पुढच्या हंगामापूर्वी संपूर्ण सपोर्ट स्टाफच बदलला आहे.
गेल्या तीन हंगामात चेन्नईची कामगिरी निराशाजनक राहिली होती. यानंतर आता गेल्या अनेक वर्षांपासून सोबत असलेल्या अनेक प्रशिक्षकांना चेन्नईने निरोप दिला असून नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. पण हे बदल करताना एक मोठा निर्णय चेन्नईने घेतला आहे. त्यांनी फलंदाजी प्रशिक्षकाची नेमणूकच केलेली नसून याच निर्णयासह ते पुढे जाणार आहेत.