

From 14 km Cycle Ride to CSK Debut Who Is Prashant Veer
esakal
IPL 2026 Chennai Super Kings vs Punjab Kings Marathi Update: सलामीलाच अपयश पदरी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जसमोर इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आज पंजाब किंग्सचे आव्हान आहे. तंदुरुस्त नसलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत खेळणारा चेन्नईचा संघ आता तसा नवोदित खेळाडूंचा आहे; पण सलामीच्या सामन्यात त्यांना राजस्थान रॉयल्स संघाकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तो पराभव विसरून त्यांना नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. चेन्नईसाठी हा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर होत आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. खेळपट्टी फलंदाजीस पोषक असण्याची शक्यता आहे.