Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Curtly Ambrose Story: आईच्या सांगण्यावरून वयाच्या २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात करणारा एक मुलगा पुढे जाऊन जगातील सर्वात घातक गोलंदाज बनेल असं कोणाला वाटलंही नसेल. पण ही कहाणी आहे सर कर्टली ॲम्ब्रोज यांची. त्यांच्या आईच्या त्या ऐतिहासिक घंटेची गोष्ट जाणून घ्या.
Curtly Ambrose Story

Curtly Ambrose Story

Sakal

Updated on

जगातील कोणत्याही कोपऱ्यात त्याने जेव्हा कसोटीत विकेट घेतली, तेव्हा त्याच्या आईने घराबाहेरची घंटा वाजवली, ही घंटा तब्बल ४०५ वेळा वाजवली गेली. ही कहाणी आहे. ६ फूट ७ इंच उंच धिप्पाड वेस्ट इंडिजचे गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोस (Curtly Ambrose) यांची.

आजही दिग्गज गोलंदाजांमध्ये अॅम्ब्रोस यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या काळात ते ४०० हून अधिक कसोटी विकेट्स घेणारे केवळ पाचवेच गोलंदाज होते. त्यांनी आणि कर्टनी वॉल्श यांनी मिळून त्यांच्या काळात प्रतिस्पर्ध्यांना अक्षरश: हैराण करणारी गोलंदाजी केली होती. त्यांची गोलंदाजीतील भागीदारी सर्वाधिक गाजलेली भागीदारी राहिली.

Curtly Ambrose Story
Viral Cricket Video: 6,6,6,6,6,6! सहा चेंडू, सहा षटकार... युवराज सिंगसारखी तुफान फटकेबाजी, पण इंग्लंडच्या फलंदाजाचा हा पराक्रम आहे थोडा वेगळा Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com