COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

Rishikanta Singh Commonwealth Games 2026 silver medal: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या पदकसंख्येत आणखी एका यशाची भर पडली. पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात ऋषिकांत सिंग याने शानदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.
Rishikanta Singh Commonwealth Games 2026 silver medal

Rishikanta Singh Commonwealth Games 2026 silver medal

Updated on

Commonwealth Games 2026 India medal tally: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या पदकसंख्येत आणखी एका पदकाची भर पडली आहे. पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात वेटलिफ्टर ऋषिकांत सिंग याने शानदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. त्याने एकूण २६४ किलो (स्नॅच १२१ किलो + क्लीन अँड जर्क १४३ किलो) वजन उचलत भारताला स्पर्धेतील आणखी एक पदक मिळवून दिले. ऋषिकांतने स्नॅच प्रकारात १२१ किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वीचा विक्रम १२० किलोचा होता. तिसऱ्या प्रयत्नात त्याने हा विक्रम मोडत इतिहास रचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com