चेतेश्वर पुजाराची काल निवृत्ती अन् आज दुसऱ्या खेळाडूने माफी मागून मागे घेतला निवृत्तीचा निर्णय; देशासाठी खेळण्यास पुन्हा सज्ज...

Dané van Niekerk comeback after retirement : भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ राहिलेला चेतेश्वर पुजाराने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यात दक्षिण आफ्रिकेच्या माजी महिला कर्णधार डॅने व्हॅन निएकर्क हिने आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेत पुनरागमनाचा निर्धार केला आहे.
Dané van Niekerk comeback after international retirement
Dané van Niekerk comeback after international retirement esakal
Updated on
Summary
  • डॅन व्हॅन निएकेर्कने तिचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.

  • मार्च २०२३ मध्ये तिने तंदुरुस्ती चाचणीत नापास झाल्यामुळे निवृत्ती घेतली होती.

  • निवृत्ती मागे घेतल्यानंतर तिने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची आणि क्रिकेट परिवाराची माफी मागितली.

Dané van Niekerk’s emotional apology to Cricket South Africa : दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाची स्टार डॅन व्हॅन निएकेर्कने तिचा निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. ती पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमधील एक असलेल्या निएकेर्कने मार्च २०२३ मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. तंदुरुस्तीच्या चाचणीत नापास झाल्यामुळे तिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तिने हा निर्णय घेतला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com