

Daryl Mitchell & Glenn Phillips | India vs New Zealand 3rd ODI
Sakal
Daryl Mitchell ODI Record in India: इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड संघात तिसरा वनडे सामना रविवारी (१८ जानेवारी) खेळवला जात आहे. हा सामना मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
या संपूर्ण मालिकेत न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. त्याने तिन्ही सामन्यात मोठी खेळी केली आहे. त्याने आता रविवारी तिसऱ्या वनडेतही शतकी धमाका करत मोठा विक्रम केला आहे. त्याच्याशिवाय ग्लेन फिलिप्सनेही (Glenn Phillips) शतक केले आहे.