

India vs New Zealand 3rd ODI
Sakal
India vs New Zealand, 3rd ODI, Playing XI: भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे. या मालिकेत १-१ अशी बरोबरी असल्याने तिसरा सामना निर्णायक आहे. भारतीय संघाने २०१९ नंतर मायदेशात वनडे मालिका गमावलेली नाही. पण आता न्यूझीलंडविरुद्ध शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.
दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड १९८९ पासून भारत दौऱ्यावर वनडे मालिका खेळत असली तरी त्यांनी अद्याप भारतात वनडे मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारताला भारतात हरवण्यासाठी न्यूझीलंडलाही मोठे प्रयत्न करावे लागतील.