
David Miller Raised Question on ICC Management :काल चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडविरूद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान आता संपुष्टात आले आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने आफ्रिकेसमोर ३६२ धावांचा डोंगर उभा केला. धावांचा पाठवलाग करताना आफ्रिकन फलंदाज डेव्हिड मिलरने जलद शतक ठोकले, पण आफ्रिकेला अपयश आले. त्यानंतर आता डेव्हिड मिलरने मॅनेजमेंटवर प्रश्न उपस्थित केला आहे.