IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

Delhi Capitals ने चिन्नास्वामी स्टेडियमवर Royal Challengers Bengaluru वर रोमांचक विजय मिळवत आयपीएल 2026 मध्ये मोठा उलटफेर केला.
RCB vs DC: Miller Turns Game in 3 Balls, Delhi Snatch Victory

RCB vs DC: Miller Turns Game in 3 Balls, Delhi Snatch Victory

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Marathi Update: दिल्ली कॅपिटल्सने हातचा सामना अवघड बनवला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच खेचली. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवरी हा सामना चुरशीचा झालेला.. लोकेश राहुल व त्रिस्तान स्तब्स यांनी अर्धशतकी खेळी करून DC ला विजयी मार्गावर ठेवले होते, परंतु RCB च्या भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड व कृणाल पांड्या यांनी अप्रतिम मारा करताना सामन्यात चुरस निर्माण केली. पण, RCB कडे शेवटचं षटक फेकण्यासाठी प्रमुख गोलंदाज राहिला नाही आणि रोमारिओ शेफर्डच्या हातात चेंडू सोपवला गेला. त्याने पहिल्या २ चेंडूंत प्रत्येकी १ धाव दिली, पण डेव्हिड मिलरने पुढील ३ चेंडूंत मॅच फिरवली. दिल्लीने ६ विकेट्स राखून बाजी मारली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com