David Warner: ९ षटकार अन् ११ चौकार... पुन्हा घोंगावलं वॉर्नरचं वादळ; शतक ठोकत विराट कोहलीशी बरोबरी

David Warner Century in BBL: ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्ससाठी आक्रमक शतक ठोकले. त्याचे हे शतक विक्रमी ठरले आहे. त्याने विराट कोहलीच्या एका विक्रमाशी बरोबरीही केली आहे.
David Warner

David Warner

Sakal

Updated on

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसत नसला, तरी तो सध्या बिग बॅश लीगमध्ये (BBL) मैदान गाजवताना दिसत आहे. सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग २०२५-२६ स्पर्धा सध्या सुरू आहे.

या स्पर्धेत त्याने शनिवारी (३ जानेवारी) सिडनी थंडर्ससाठी होबार्ट हरिकेनविरुद्ध आक्रमक शतक केले आहे. हे त्याच्यासाठी विक्रमी शतकही ठरले.

<div class="paragraphs"><p>David Warner</p></div>
R Ashwin ची अचानक BBL मधून माघार! वॉर्नरच्या टीमकडून न खेळण्याचं कारण सांगताना लिहिलं भावनिक पत्र
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com