KL Rahul becomes first player with 1000 runs for three IPL teams
esakal
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Marathi Cricket News : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये अचानक मुसंडी मारून स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले आहे. दिल्ली कॅपिटल्सही अजून शर्यतीत असले तरी मागील पाच सामन्यांत चार पराभवांमुळे त्यांचा प्रवास खडतर झाला आहे. अशा परिस्थितीत KKR ला घरच्या मैदानावर नमवण्याचा DC चा इरादा आहे. पण, त्यासाठी त्यांना सर्व आघाड्यांवर चांगली कामगिरी करणेही गरजेचे आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत ३४ सामने झाले आहेत आणि कोलकाताने १९-१५ अशी आघाडी घेतली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरही KKR कडे ६-५ अशी बढती आहे आणि २०२२ पासून त्यांनी सर्व ३ सामने जिंकले आहेत.