“तुमचं काय ते लवकर ठरवा, आम्ही वर्ल्ड कप खेळण्यासाठी तयार आहोत” Iceland Cricket ने पाकिस्तानची उडवली खिल्ली

Iceland Cricket trolls Pakistan over T20 World Cup boycott: वर्ल्ड कपमधील सहभागाबाबत पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोंधळावर आता Iceland Cricket ने जोरदार टोला लगावला आहे. ही मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Iceland Cricket trolls Pakistan with a viral post amid T20 World Cup participation

Iceland Cricket trolls Pakistan with a viral post amid T20 World Cup participation

esakal

Updated on

Iceland Cricket offers to replace Pakistan in World Cup: आइसलँड क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बहिष्कार टाकण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवली आहे. ७ फेब्रुवारीपासून वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होतेय आणि पाकिस्तानचं अजूनही सहभागाबाबत ठरलेले नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा ( BCB) हट्ट धुडकावत आयसीसीने त्यांना स्पर्धेबाहेर केले आणि त्यांच्याजागी स्कॉटलंड वर्ल्ड कप खेळेल, हे जाहीर केले. त्यानंतर पीसीबीने आक्रमक भूमिका घेतली आणि मोहसिन नक्वी यांनी स्पर्धेवर बहिष्काराची भाषा केली. त्यावरून आइसलँड क्रिकेट बोर्डाने पीसीबीला ट्रोल केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com