

Delhi vs Manipur 11 bowlers Used: सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेचा दिल्ली विरुद्ध मणिपूर हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. मणिपूर संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १२० धावा उभ्या केल्या आहेत. तसं या सामन्याची दखल फार कुणी घेतली नसती, परंतु दिल्लीने सर्वच्या सर्व ११ खेळाडूंकडून गोलंदाजी करून घेतली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत प्रथमच असे घडले आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून ११ खेळाडूंनी गोलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा केला जात आहे.