IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Delhi Capitals announce new head coach : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने मोठी घोषणा केली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि 'दादा' म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली आता दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.
Sourav Ganguly appointed Delhi Capitals head coach for IPL 2027

Sourav Ganguly appointed Delhi Capitals head coach for IPL 2027

Updated on: 

Sourav Ganguly appointed Delhi Capitals head coach for IPL 2027: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वी सर्व संघांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ट्रेड विंडोतून चांगले खेळाडू आपापल्या संघात घेण्यास फ्रँचायीझी चर्चा करत आहेत. चेन्नई सुपर किंग्सने स्टीफन फ्लेमिंग यांच्याजागी झहीर खान याची मुख्य प्रशिक्षपदी नियुक्ती केली. त्यात आता दिल्ली कॅपिटल्सनेही आयपीएल २०२७ साठी नवा मुख्य प्रशिक्षक जाहीर केला. जेएसडब्ल्यू (JSW) आणि जीएमआर (GMR) यांच्या संयुक्त मालकीच्या DC ने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचीमुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com