Shikhar Dhawan: कायदेशीर सामना धवनने जिंकला! पहिल्या बायकोकडून मिळणार ५.२ कोटी, आयेशासाठी वाढल्या अडचणी

Legal Victory for Shikhar Dhawan: शिखर धवनला दिल्ली कौटुंबिक न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याची पहिली पत्नी आयेशा मुखर्जी हिला ५.७२ कोटी रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
shikhar Dhawan ex wife aesha Mukerjee

shikhar Dhawan ex wife aesha Mukerjee

Sakal

Updated on

भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर शिखर धवनने काही दिवसांपूर्वीच आयरीश गर्लफ्रेंड सोफी शाईन हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. दिल्लीत अनेक सेलिब्रेटिंच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला.

यानंतर काहीच दिवसात आता शिखरसाठी (Shikhar Dhawan) आनंदाची बातमी आली आहे. त्याला दिल्लीतील कौटुंबिक न्यायालयाकडून (Delhi Family Court) दिलासा मिळाला. आता त्याची पहिली पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) हिला त्याला ५.७२ कोटी द्यावे लागणार आहेत.

shikhar Dhawan ex wife aesha Mukerjee
Shikhar Dhawan चं दुसरं लग्न; रोहित शर्मा, चहलची उपस्थिती, तर विराट-रहाणेच्या कमेंटने वेधले लक्ष
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com