
India's probable squad for Champions Trophy 2025: रोहित शर्मा अँड टीमचे पुढचे ध्येय चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकण्याचे आहे. २०१३ नंतर भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. २०१७ मध्ये पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारताला पराभूत केले होते. ७ वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ १२ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. पण, कर्णधार रोहित व विराट कोहली यांचा फॉर्म हा टीम इंडियाची डोकेदुखी बनला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही हे दोघं अपयशी ठरले. अशात चॅम्पियन्स ट्रॉफीत त्यांच्याकडून सीनियर म्हणून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.