

Devdutt Padikkal - Dhruv Jurel | Sri Lanka vs India 1st Test
Sakal
Sri Lanka vs India 1st Test Day Two Marathi News: श्रीलंकेविरुद्ध गॉलमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघात पहिल्या दोन्ही दिवशी वर्चस्व ठेवले आहे. या सामन्याचा दुसरा दिवस संपला असून भारताने ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
देवदत्त पडिक्कलने दीडशे धावांची खेळी करत लक्ष वेधले, तर पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी श्रीलंकन गोलंदाजांची कामगिरी चांगली झाली. पहिल्या दिवशी दोनच विकेट श्रीलंकेला घेता आले होते. पण दुसऱ्या दिवशी पावसामुळे अर्धा दिवस वाया गेल्यानंतरही त्यांनी भारतीय संघाच्या ७ विकेट्स घेण्यात यश मिळवले.