IND vs SL, 1st Test : द्रविड-पुजाराच्या क्लबमध्ये पडिक्कलची एन्ट्री; पण द्विशतकाकडे वाटचाल करताना झाला घात

Devdutt Padikkal Joins Dravid & Pujara: देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्धची गॉल कसोटी गाजवली आहे. त्याने दीडशतक करत राहुल द्रविड - चेतेश्वर पुजाराच्या यादीत स्थान मिळवले.
Devdutt Padikkal | Sri Lanka vs India 1st Test

Devdutt Padikkal | Sri Lanka vs India 1st Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India 1st Test : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉलमध्ये शनिवारपासून (१५ ऑगस्ट) सुरू झालेल्या कसोटी सामन्याचे पहिले दोन्ही दिवस देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) गाजवले आहेत. त्याने दमदार फलंदाजी करत दीडशतकी खेळी केली. पण अखेर त्याची विकेट घेण्यात दुसऱ्या दिवशी श्रीलंकेला यश मिळाले आहे. पण पडिक्कलने मोठा विक्रमही केला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने सलामीवीर यशस्वी जैस्वालची विकेट ३२ धावांवर पहिल्या दिवशी सुरुवातीलाच गमावली होती. पण त्यानंतर देवदत्त पडिक्कलला फलंदाजीला उतरला. त्याने आणि केएल राहुलने (KL Rahul) भारताचा डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करत श्रीलंकन गोलंदाजांना मेहनत करायला लावली होती.

Devdutt Padikkal | Sri Lanka vs India 1st Test
IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com