

Devdutta Padikkal
Sakal
Devdutta Padikkal Record in VHT: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिक्कल अफलातून फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने या स्पर्धेत आत्तापर्यंत ४ शतके केली असून तो सोमवारी मुंबईविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात पाचव्या शतकाच्याही उंबरठ्यावर होता.
मात्र पावसामुळे हा सामना थांबला आणि व्हीजेडी मेथडनुसार कर्नाटकला ५५ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे पडिक्कलला (Devdutta Padikkal) शतक पूर्ण करता आले नाही, पण कर्नाटकच्या विजयामुळे मुंबईचे (Mumbai) मात्र या स्पर्धेतील आव्हान संपले आहे. तसेच कर्नाटकने (Karnataka) उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.