

Irfan Pathan on Riyan Parag
Sakal
भारत आणि न्यूझीलंड संघात सध्या वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी वडोदरामध्ये पार पडला, ज्यात भारतीय संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १- ० अशी आघाडी घेतली आहे.
पण पहिल्या सामन्यादरम्यान भारतीय संघाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या मालिकेतील उर्वरित दोन्ही सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.