

Devdutt Padikkal Sunburn Tattoo Viral Photo
Sakal
Sri Lanka vs India, 2nd Test Marathi News) श्रीलंकेविरुद्ध भारताचा कोलंबोत झालेला दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पण पहिला सामना भारताने जिंकला असल्याने दोन सामन्यांची मालिका भारताने १-० अशी जिंकली. या मालिकेत भारतासाठी देवदत्त पडिक्कलने कमालीचा खेळ केला. त्याने दोन्ही कसोटीत शतके केली.
तो या मालिकेत भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तसेच त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला. दरम्यान कोलंबो कसोटीत मात्र भारतीय संघाला जवळपास २५० षटके क्षेत्ररक्षण करावे लागले, त्यामुळे कोलंबोने पडिक्कलला एक अनोखी आठवण दिली आहे.