आर. अश्विनने डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या CSK कडील निवडीवर नियमभंगाचा आरोप केला.
CSK ने शनिवारी अधिकृत पत्रक काढून सर्व आरोप फेटाळले.
ब्रेव्हिसला गुरजपनीत सिंगच्या जागी २.२ कोटींमध्ये रिप्लेसमेंट म्हणून घेतले गेले.
CSK official clarification on Dewald Brevis replacement player: गुरजपनीत सिंगच्या जागी रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून डेवॉल्ड ब्रेव्हिसची झालेली निवड ही नियमबाह्य असल्याची चर्चा आर अश्विनच्या विधानानंतर सुरू झाली होती. ब्रेव्हिसला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी CSK ने अंडर द टेबल रक्कम मोजल्याचा अप्रत्यक्ष दावा केला होता आणि त्यामुळे फ्रँचायझीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण, चेन्नई सुपर किंग्ज शनिवारी अधिकृत पत्रक काढून यावर स्पष्टीकरण दिले.