संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सला रिलीज करण्याची विनंती केल्याचं वृत्त चर्चेत आहे.
राजस्थान रॉयल्सने ध्रुव जुरेलच्या कर्णधारपदाबद्दल X पोस्ट केली असून, त्यातून नव्या कर्णधाराची शक्यता वर्तवली जातेय.
ध्रुव जुरेलला दुलीप ट्रॉफीसाठी मध्य विभागाचा कर्णधार नियुक्त करण्यात आलं आहे.
Did Rajasthan Royals hint at replacing Sanju Samson as captain? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ची ट्रेडिंग विंडो खुली आहे आणि फ्रँचायझी संघात बदल करण्याच्या प्रयत्नात आहे. संजू सॅमसन, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आदी खेळाडूंच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यात संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार असल्याच्या वृत्ताने सारेच चक्रावले आहे. RR चा सर्वात यशस्वी कर्णधार, सर्वाधिक धावा करणारा फलंदाज संजू चेन्नई सुपर किंग्सच्या वाटेवर आहे. त्याने राजस्थान फ्रँचायझीला रिलीज करण्याची विनंती केली आहे. त्यात आता फ्रँचायझीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. संजूच्या जागी नवा कर्णधार जाहीर केला का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.