Krunal Pandya and Nicholas Pooran were involved in a heated exchange
esakal
IPL 2026 controversy after LSG vs RCB match: लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुरुवारी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाचा धक्का दिला. मिचेल मार्शच्या शतकी खेळीनंतर प्रिंस यादवने गोलंदाजीत कमाल दाखवली आणि LSG ने ९ धावांनी मॅच जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम राखले. प्रथम फलंदाजी करताना लखनौने ३ बाद २०९ धावा केल्या, DLS मुळे RCB समोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले गेले आणि त्यांना २०३ धावांपर्यंत पोहोचता आले. या सामन्यात बंगळुरूचा गोलंदाज कृणाल पांड्या अन् लखनौचा निकोलस पूरन यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण, आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.