
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने बुधवारी (५ मार्च) वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मंगळवारी भारताने ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ४ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचे या स्पर्धेतील आव्हानही संपले. हा सामना स्मिथचा अखेरचा वनडे सामना ठरला.
विशेष म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्मिथने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. परंतु, त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीच्या पुढे जाता आले नाही.