
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी (४ मार्च) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना झाला होता. या सामन्यातील अनेक क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. याचदरम्यान, एका युवतीचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर ती कोण आहे ही चर्चा सुरू झाली.