
कोणत्याही खेळाडूसाठी त्याच्या कारकिर्दीचा शेवट हा भावनिक असतो. त्यामुळे शेवटच्या लढतीत चांगली कामगिरी करून आपल्या खेळाला अलविदा करण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूची असते. मात्र प्रत्येक खेळाडूसाठी शेवट चांगलाच असतो, असे नाही. असेच श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू दिमुथ करूणारत्नेबाबत घडले आहे.
करुणारत्ने सध्या गॉलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. हा सामना गुरुवारपासून (६ फेब्रुवारी) सुरू झाला असून हा त्याचा कारकिर्दीतील १०० वा आणि अखेरचा कसोटी सामना आहे. या सामन्यानंतर तो कसोटीतून निवृत्त होणार असल्याचे त्याने स्पष्ट केले होते.