India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

Dinesh Karthik India’s all-time T20I XI : भारताच्या ट्वेंटी-२० क्रिकेट इतिहासातले सर्वोत्तम खेळाडू एकत्र आणत दिनेश कार्तिकने आपला ऑल टाईम भारत टी२० संघ जाहीर केला आहे. २००७ च्या पहिल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या कार्तिकने रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांसारख्या दिग्गजांचा समावेश केला.
BCCI BREAKS SILENCE ON ROHIT SHARMA AND VIRAT KOHLI FUTURE
BCCI BREAKS SILENCE ON ROHIT SHARMA AND VIRAT KOHLI FUTUREesakal
Updated on
Summary
  • दिनेश कार्तिकने भारताचा ऑल-टाईम ट्वेंटी-२० आय संघ जाहीर केला आहे.

  • या संघाचे नेतृत्व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आले आहे.

  • कार्तिकने सलामीसाठी रोहित शर्मा आणि अभिषेक शर्मा यांची निवड केली आहे.

Dinesh Karthik names MS Dhoni as captain of his India All-Time T20I XI : भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याने भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ निवडला आहे. २००७च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या कार्तिकने या फॉरमॅटमधील भारताचे सर्वोत्तम ११ खेळाडू निवडले आहेत. त्याने अशा दोन खेळाडूंची निवड केली, की ज्यांनी आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने रोहित शर्माला या संघाचा कर्णधार केलेले नाही, तर महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या संघाचा कर्णधार आहे. MS Dhoni च्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com