

Dinesh Karthik - Shaun Marsh
Sakal
लेजेंड्स प्रो टी20 लीगने सहभागी होणाऱ्या आणखी स्टार खेळाडूंची घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढवली आहे. नवीन समावेशांमध्ये दिनेश कार्तिक, शॉन मार्श, अमित मिश्रा, विनय कुमार आणि माँटी पनेसर यांचा समावेश आहे. हे सर्व दिग्गज खेळाडू गोव्यातील पहिल्या स्पर्धेत मैदान गाजवण्यास सज्ज आहेत. त्यांचा अनुभवी खेळ, कामगिरी आणि चाहतावर्ग लीगला अधिक रोमांचक बनवेल.