Dinesh Karthik reacts to India’s Test humiliation — criticises Gautam Gambhir
esakal
भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) याने भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटी ४०८ धावांनी जिंकून मालिका २-० अशी खिशात घातली. यापूर्वी मागील वर्षी न्यूझीलंडने यजमान भारताविरुद्ध ३-० असा विजय मिळवला होता. परदेशी संघ आधी भारतात कसोटी खेळण्यासाठी घाबरत होता, आता तसं दिसत नाही, असे कार्तिक म्हणाला.