Ajinkya Rahane reaction on Pakistan T20 World Cup boycott
esakal
Cricket
अजिंक्य रहाणे संतापला, पाकिस्तानला सुनावले! म्हणाला, T20 World Cup वर बहिष्काराची भाषा कसली करताय, तेवढा दम...
Ajinkya Rahane reaction on Pakistan T20 World Cup boycott: पाकिस्तानकडून स्पर्धेच्या बहिष्काराची भाषा सुरू असताना भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Pakistan Trolled After Boycott Drama : भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याने पाकिस्तान क्रिकेट संघाकडे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बहिष्कार टाकण्याइतका दम नाही, असा दावा केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB ) प्रमुख मोहसिन नक्वी यांनी वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली आहे. त्यावर अजिंक्यने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाच्या जागी आयसीसीने स्कॉटलंडचा समावेश केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिर्ची झोंबली होती. सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत बांगलादेशने वर्ल्ड कप स्पर्धेचे भारतातील सामने खेळण्यास नकार दिला होता.
