देवाच्या कृपेने विनोद कांबळी आता ठीक; “कोण खोटी माहिती पसरवत आहे?” पत्नीचा खुलासा म्हणाली...

Vinod Kambli Health: विनोद कांबळी यांच्या प्रकृतीबाबत पत्नी अँड्रिया हेविट यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. स्मरणशक्ती कमी असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Vinod Kambli Health Update

Vinod Kambli Health Update

esakal

Updated on

Vinod Kambli Health Update: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli )यांची प्रकृती आधीपेक्षा चांगली असली तरी त्यांची स्मरणशक्ती अजूनही कमकुवत आहे. आधीच्या गोष्टी त्यांना थोड्या-थोड्या आठवत आहेत. त्यांची प्रकृती खालावलेली नसली तरी ते अजून पूर्णपणे धोक्याबाहेर नाहीत. विनोद कांबळी यांनी मद्यपान सोडले आहे, परंतु अजून त्यांना धूम्रपानावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता आलेले नाही. ते कधी कधी विसरतात की त्यांना धूम्रपान करायचे नाही. या सगळ्यामुळे त्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो. अशातच आता विनोद कांबळी यांच्या पत्नी अँड्रिया हेविटने (Andrea Hewitt) त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com