IND vs NZ 1st Test: मोहम्मद सिराजला बाकावर बसवण्याचा निर्णय, चुकीचा नाही... गटांगळ्या खाल्ल्यानंतरही कोचकडून मोठा दावा; म्हणाला, ही सर्वोत्तम Playing XI

Why Mohammed Siraj was dropped from India playing XI ? भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचा निर्णय चांगलाच चर्चेत आला आहे. न्यूझीलंडने ५ बाद ७० वरून पहिल्या दिवशी ५ बाद २४३ असे पुनरागमन केले...
india vs new zealand 1st test

IND vs NZ 1st Test: India batting coach Shitanshu Kotak defends Mohammed Siraj's exclusion, saying dropping the pacer was not a wrong decision. Know why India backed this playing XI

esakal

Updated on: 

India Coach Makes Big Statement On Dropping Siraj And Ravindra Jadeja: मोहम्मद सिराज प्लेइंग इलेव्हनमध्ये का नाही? हा प्रश्न आज दिवसभर चर्चेत राहणार आहे. भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली आणि सिराज व रवींद्र जडेजा, हे दोन सीनियर खेळाडू भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्याचे सर्वांना आश्चर्य वाटले. रवी शास्त्री, सुनील गावस्कर, वासिम जाफर, वीरेंद्र सेहवाग आदी अनेकांनी सिराजला न खेळवण्याच्या निर्णयावर टीका केली. सिराज संघात का हवा होता, हे दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्पष्ट झालेच... यजमान न्यूझीलंडने ५ बाद ७० वरून ५ बाद २४३ धावा, करून दमदार पुनरागमन केले. असे असले तरी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी सिराजला वगळण्याचा निर्णय चुकीचा नव्हता, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

Loading content, please wait...