Mumbai Indians चे खेळाडू सूसाट; इशान पाठोपाठ Tilak Varma चे खणखणीत शतक; Video

Duleep Trophy 2024 : दुलीप करंडक स्पर्धेत मुंबई इंडियन्सचे खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. त्यांच्या फटकेबाजीने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी निवड समितीसमोर पेच निर्माण केला आहे.
Duleep Trophy
Duleep Trophy esakal
Updated on: 

Duleep Trophy 2024 Tilak Varma: दुलीप ट्रॉफी २०२४-२५ हंगामाच्या दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्सच्या इशान किशन, तिलक वर्मा व अंशूल कंबोज यांनी दम दाखवला. इशानपाठोपाठ तिलकनेही त्याच्या संघासाठी शतकी खेळी केली. भारत अ संघाकडून खेळणाऱ्या तिलकने १९३ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने १११ धावांची नाबाद खेळी केली. त्याला शाश्वत रावतची ( ६४*) चांगली साथ मिळाली. भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी संघ अजून निवडलेला नाही आणि ही कामगिरी त्यादृष्टीने महत्त्वाची ठरतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com