Duleep Trophy 2024
Duleep Trophy 2024esakal

Duleep Trophy 2024: टीम इंडियात एन्ट्री घेऊ पाहणारा स्टार फलंदाज फेल, निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; रोहितची चिंता वाढली

Shreyas Iyer Duleep Trophy: भारतीय संघाच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाला आजपासून दुलीप ट्रॉफीतून सुरूवात झाली आहे. या सामन्यात टीम इंडियाचे बरेच सीनियर्स खेळाडू खेळत आहेत...
Published on

Duleep Trophy 2024 Shreyas Iyer : दुलीप करंडक स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. भारत अ विरुद्ध भारत ब आणि भारत क विरुद्ध भारत ड यांच्यात लढत सुरू आहेत. या स्पर्धेत भारतीय संघातील बरेच सीनियर्स खेळाडू खेळल आहेत आणि त्यामुळे या स्पर्धेवर चाहत्यांचे लक्ष लागून आहे. रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव व इशान किशन यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. लोकेश राहुल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आदी खेळाडूंवर लक्ष असणार आहे. अशात भारताच्या मधल्या फळीतील स्टार फलंदाजाला अपयश आले आहे.

भारत क आणि भारत ड यांच्यातला सामन्यात पहिल्या तासाभरात धक्कादायक निकाल पाहायला मिळतोय.. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत क संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत ड संघ खेळतोय आणि प्रथम फलंदाजीला आलेल्या संघाची अवस्था ५ बाद ३४ अशी दयनीय झाली आहे.

Duleep Trophy 2024
IND vs BAN : भारतीय संघात २५ वर्षीय खेळाडू पदार्पण करणार; Jasprit, Shami ची उणीव भरून काढणार, जाणून घ्या संभाव्य संघ

अथर्व तायडे व यश दुबे ही जोडी सलामीला आली. पण, अंकुश कंबोजने पहिल्या सहा षटकांत दोघांनाही माघारी पाठवले. तायडे ४ व दुबे १० धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर व देवदत्त पड्डिकल दम दाखवतील असे वाटले होते, परंतु वैशाक विजयकुमारने दोघांचा अडथळा दूर केला. श्रेयस ९ धावांवर बाद झाला आणि पड्डिकल भोपळ्यावर माघारी परतला. हिमांशू चव्हाणने भारत ड संघाला पाचवा धक्का देताना रिकी भूईला ( ४) माघारी पाठवले. Ks Bharat आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरलेला दिसतोय..

Shreyas Iyer
Shreyas IyerSakal

श्रेयसचे अपयश रोहितसाठी डोकेदुखी...

श्रेयस अय्यर हा फेब्रुवारी २०२४ पासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. तो भारताच्या मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज आहे. तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु त्याचे अपयश कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढवणारे ठरू शकते. श्रेयसने १४ कसोटी सामन्यांत ३६.८६ च्या सरासरीने १ शतक व ५ अर्धशतकांसह ८११ धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com