Vaibhav Sooryavanshi
esakal
East Zone vs Central Zone Duleep Trophy 2026: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi ) दुलीप ट्रॉफीत वादळी खेळी केली. त्याचे शतक थोडक्यात हुकले. विदर्भाच्या हर्ष दुबेच्या चेंडूवर मारलेला फटका अर्शद खानने सीमारेषेवर टिपला अन् पूर्व विभागाला झटका बसला. वैभवने पहिल्या विकेटसाठी अभिमन्यू इश्वरसह १६१ धावांची भागीदारी केली.