दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत पश्चिम विभागाकडून यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर असे स्टार खेळाडू खेळत आहेत.
इंग्लंड दौऱ्यावर दोन शतकं ठोकलेल्या यशस्वीकडून अपेक्षा होत्या, पण तो फक्त ४ धावांवर बाद झाला.
एच देसाई (१) देखील लवकर बाद झाला आणि पश्चिम विभाग २ बाद १० अशी बिकट परिस्थितीत सापडला.
Yashasvi Jaiswal dismissal vs Central Zone Duleep Trophy 2025 : यशस्वी जैस्वाल, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज अशा स्टार खेळाडूंना एकाच संघातून खेळण्याची संधी मिळत आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पश्चिम विभाग संघाकडून हे सर्व खेळत आहेत आणि मध्य विभागाविरुद्धचा हा सामना बंगळुरूत सुरू आहे.