DJ Brovo ने अचानक घेतला निवृत्तीचा निर्णय, नाईट रायडर्ससाठी 'या' स्पर्धेत अखेरचे खेळणार

Dwayne Bravo Retirement: ड्वेन ब्रावोने शनिवारी निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेत सर्वांना चकीत केले.
Dwayne Bravo
Dwayne BravoSakal
Updated on

Dwayne Bravo CPL Retirement: वेस्ट इंडिज आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो याने शनिवारी मोठा निर्णय घेतला. त्याने जाहीर केले की तो कॅरेबियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेत आहे. त्याने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीग सुरू झाल्यापासून ब्रावो या स्पर्धेतील प्रमुख खेळाडूंपैकी एक राहिला आहे. पण आता तो सध्या चालू असलेल्या २०२४ च्या हंगामात या स्पर्धेत अखेरचा खळताना दिसणार आहे. तो या हंगामातही त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. या संघाचा पहिला सामना रविवारी सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्सविरुद्ध होणार आहे.

Dwayne Bravo
Dwayne Bravo: पाथिराना, मुस्तफिजूरला कोचिंग का करत नाही? CSK चा कोच ब्रावोने सांगितलं वैशिष्ट; यॉर्करबद्दलही केलं मोठं भाष्य
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com