KKR vs MI Live: कोलकाता नाइट रायडर्स मॅच पूर्वीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होणार? थेट इडन गार्डनवरून महत्त्वाचे अपडेट्स

KKR vs MI match rain update IPL 2026: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यापूर्वी चाहत्यांची चिंता वाढवणारे चित्र समोर आले आहे. कोलकात्यात मुसळधार पावसामुळे इडन गार्डन्स स्टेडियम पूर्णपणे कव्हर्सखाली गेले असून सामन्यावर संकटाचे ढग दाटले आहेत.
Heavy rain lashes Eden Gardens in Kolkata

Heavy rain lashes Eden Gardens in Kolkata

esakal

Updated on

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders live weather updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आज कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खेळवला जाणार आहे. MI ला १२ सामन्यांत ८ सामने गमवावे लागल्याने, त्यांचे प्ले ऑफचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. पण, १२ सामन्यांत ११ गुण कमावणाऱ्या KKR चे आव्हान अजून कायम आहे. त्यामुळे त्यांना उर्वरित दोन सामने जिंकावे लागणार आहेत. अशात इडन गार्डनवर होणारा सामना अजिंक्य रहाणेच्या संघासाठी महत्त्वाचा आहे. पण, इडन गार्डवरून आलेल्या ताज्या अपडेट्सनुसार आजचा सामन्यावर संकट आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com