
England U19 Clinch Series, But Vaibhav Suryavanshi's Explosive Batting Wins Hearts : इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाने पाचव्या व अंतिम वन डे सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील संघावर ७ विकेट्स व ११३ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने ही मालिका ३-२ अशी जिंकली. भारतीय संघाने वैभव सूर्यवंशीच्या दमदार खेळीच्या जोरावर या मालिकेत पुनरागमन केले आणि मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. पण, निर्णायक सामन्यात वैभवला मोठी खेळी करता आली नाही आणि भारताची हार झाली. भारताचे २११ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ३१.१ षटकांत पार केले.