इंग्लंडची ५ बाद ८० वरून ३०९ धावांपर्यंत मजल
एकांश सिंगच्या शतकाने भारताची डोकेदुखी वाढवली
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा कसोटीत अपयशी
ENG U19 vs IND U19, 2nd Youth test : भारत-इंग्लंड यांच्या १९ वर्षांखालील संघाच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा बराचसा वेळ पावसात वाया गेला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करताना इंग्लंडचा निम्मा संघ ८० धावावंर तंबूत पाठवला होता, परंतु इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी संघर्ष केला. भारतीय वंशाच्या एकांश सिंगने (Ekansh Singh)च्या शतकाने इंग्लंडला सावरले. त्याला कर्णधार थॉमस रेव व जेम्स मिंटो यांची साथ मिळाली. भारतालाही डावाची अपेक्षित सुरुवात करता आली नाही आणि वैभव सूर्यवंशीच्या ( Vaibhav Suryavanshi) अपयशाने भारतीयांचे टेंशन वाढले आहे.