IND Under-19 vs England U19, 1st Youth test at Beckenham Live Scorecard : भारताचा १९ वर्षांखालील संघही इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि पहिल्या डावात त्यांनी ५४० धावांचा डोंगर उभा केला आहे. प्रत्युत्तरात यजमानांची अवस्था ७ बाद ३८३ अशी झाली आहे. फलंदाजीत फार कमाल दाखवू न शकलेल्या वैभव सूर्यवंशीने गोलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी करत योगदान दिले. इंग्लंडचा संघ तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना अजूनही १५६ धावांनी पिछाडीवर आहे.